# शाळेचे नाव - जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा. कवडेवाडी (वरची) ता. वाशी,
जि.
उस्मानाबाद
# शाळेबद्दल थोडक्यात - कवडेवाडी
(व) हे छोटेसे गाव असून दुष्काळ गाव व अवर्षणग्रस्त भाग आहे. वाशी शहरापासून ६
किलोमीटर वर वसलेले २५० लोकसंख्येचे गाव आहे. जमीन मुरमाड आहे, जेमतेम शेती होते.
# शाळेची स्थापना - १९६५
# शाळेचे ब्रीद - मराठी भाषेचा
दांडगा अभिमान
# काही माजी विद्यार्थी -
व्यावसायिक, सरकारी नोकरदार
# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
१. माझी शाळा - स्वच्छ व सुंदर शाळा
२. सामान्य ज्ञान स्पर्धा
३. ई-लर्निंग सुविधा
४. संगणक शिक्षण
५. झाडे लावा, झाडे जगवा
६. गांडूळ खत, सेंद्रिय खत
७. भाजीपाला संवर्धन
८. गप्पी मासे संवर्धन केंद्र
९. घनकचरा व्यवस्थापन
१०. फुलांची सुंदर बाग
११. शोभेची झाडे
१२. आकर्षक विद्यार्थी-शिक्षक गणवेष
१३. दिनांक तो पाढा
१४. मी वाचनपती होणार
१५. शैक्षणिक साहित्य निर्मिती
१६. वर्गसजावट
१७. सांस्कृतिक कार्यक्रम
१८. वार्षिक स्नेहसंमेलन
१९. विद्यार्थी बचत बँक
२०. स्काऊट अंतर्गत 'कब' पथक
२१. शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला लागवड
२२. परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड
२३. ‘सांगा तुम्ही बोलतो आम्ही’ सामान्यज्ञान उपक्रम
२४. १००% विद्यार्थी मुलभूत क्रियेत प्रवीण
२५. प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती व नवोदयसाठी विशेष मार्गदर्शन
२६. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालकांचा सक्रीय सहभाग
# शासकीय योजना :-
१. शालेय पोषण आहार
२. दैनिक उपस्थित भत्ता
३. मोफत पाठ्यपुस्तके
४. मोफत गणवेष
५. बाल मंत्री मंडळ
६. आरोग्य तपासणी
७. ग्राम सर्वेक्षण
८. स्वच्छता अभियान
# सेमी इंग्रजी पर्याय - आहे.
इयत्ता पहिली पासून चौथी पर्यंत जिल्हा परिषद नियमानुसार, सेमी इंग्रजी आहे, पण खरे ज्ञान मराठीतूनच
दिले जाते.
# शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय
नियमाप्रमाणे, सत्र सुरु होण्यापूर्वी
# शाळेचा भ्रमणध्वनी/इमेल -
९४२२११८६०४ / zppskawadewadi@gmail.com
# सर्व साधारण शाळेची वार्षिक फी -
निःशुल्क
# खेळाचे मैदान - आहे
# शाळेची यशोगाथा -
द्विशिक्षकी शाळा, पण तालुक्यात गुणवत्तेत प्रथम, शिष्यवृत्ती निकाल दरवर्षी
१००%
१. ISO ९००१:२००८ जिल्ह्यातील पहिली
नामांकित शाळा
२. गुणवत्ता विकास कार्यक्रम २००७-०८ जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
३. स्काऊट अंतर्गत कब युनिट चार पारितोषिके घेवून जिल्ह्यात प्रथम
४. ग्रामीण विकास गुणवत्ता विकास कार्यक्रम (२०० गुण) तालुक्यात द्वितीय
५. वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थी,
शिक्षण व
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
६. १००% शौचालय बांधकाम व वापरासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न
७. विद्यार्थी व शिक्षकांचा गावात, तालुका व जिल्ह्यात गौरव.
# शिक्षक वृंद -
१.
श्री दिलीप चौधरी - मुख्य अध्यापक
एम. ए. बी. एड. १२ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, आनंददायी
कृतियुक्त शिक्षणावर भर, सांस्कृतिक चळवळीतून शिक्षण रंजक बनवण्यावर कल, आगामी
काळात मराठी भाषेतील मूळ संकल्पना समाजात सक्रीय करण्यावर काम करणार. विद्यार्थी
हेच दैवत मानून शाळेशी प्रामाणिक रहाणे हाच स्वभाव.
२.
श्री रामहरी कांबळे - सहशिक्षक
# लोकसहभाग –
गावकर्यांचा उत्साह अमाप. ७०००० रु. वर्गणी करून ई-लर्निंग सुविधा सुरु केली. वेळोवेळी
आर्थिक, शारीरिक व मानसिक मदत करतात. शासकीय योजना येण्याअगोदरच पालक वर्गणी करून
शालोपयोगी साहित्य भेट देतात.
# शाळेविषयी थोडेसे –
शब्द बोलतात, शब्द पळवतात,
शब्द हसवतात, शब्द रडवतात,
शब्द बिघडवतात, शब्द घडवतात,
शब्द मोठ करतात, शब्द माणूस बनवतात,
या उक्तीचा प्रत्यय शाळेत गेल्यावरच आला. मुले म्हणजे देवाघरची फुले हे
प्रत्यक्ष शाळेत गेल्यावरच कळते. मला शाळेत गेल्यावर मंदिरात गेल्यासारखं वाटत
कारण फुलबागेतील फुल हातात पडते आणि फुलपाखरासारखी मुले सभोवताली रेंगाळतात. आम्ही
अध्ययन अध्यापनात मदत करतो पण चिमुकली कित्येक गोष्टी आम्हाला कृतीतून शिकवतात. मी
माझ्या २७ मुलांना घरच्या मुलांबरोबर प्रेम दिले आणि पितृतुल्य माया पदोपदी
अनुभवतो. त्या बालकांच्या घडविलेल्या संस्कारामुळे घरापेक्षा शाळेत जास्त करमत ते
सतत कार्यमग्नतेमुळे अशी बालके सांगतात आणि सुट्टी नको म्हणणारी सारखी बोलू
लागल्यामुळे केलेल्या कामाचे समाधान लाभते. शेवटी एकच, ‘धन्य माझी शाळा, जिने
लावला मला लळा’
# फोटो -























